सेंद्रिय कर्ब

आज काही भागामधील शेतकरंच्या व्यथा ऐकल्या एक शेतकरी व्यथा सांगत होते, “कि दोन तीन वर्षापासून आमच्या भागात टोमॅटो , मिरची जमतच नाहीं, व्हायरस कंट्रोल होतच नाहीं, कितीही भारी औषधे मारा, काही फरकच पडत नाहीं, आपल्या भागातून टोमॅटो मिरची चा विषयच संपला”. त्यांचे हे बोलणेे ऐकल्या नंतर असे कळले कि टोमॅटो , मिरची ही रोगामुळे जात असते तर कुठल्यातरी औषधाने ठिक झालेच असते, मुळ समस्या पिकाची नाहीं, मातीची आहे, तिचा कस (सेंद्रिय कर्ब) कमी झाला. बरं किती कमी झाला असेल….!! थोड़ी आकडेवारी पाहूया, सुपिक जमिनीचा सेंद्रिय कर्ब २% असतो, *तर वाळवंटात तो ०.५ % म्हणजे अर्धा टक्का असतो * तर मग आपल्या जमिनीचा किमान यापेक्षा जास्तच असायला हवा पण दुर्दैवाने वस्तुस्थिती अत्यंत भयावह अशी आहे, कि *बागायती जमिनीचा सरासरी सेंद्रिय कर्ब ०.३ % !! म्हणजे वाळवंटापेक्षा दुप्पटीने निकस जमीन,* आणि आजचा शेतकरी पिकवण्याची कसरत करत आहे भरघोस उत्पादनाची आस लावून बसलाय परिणामी कमजोर मातेच्या पोटी अशक्त व अपंग बाळ जन्माला येते, त्याप्रमाने कोणतेहि पिक लावा, रोग त्याच्या पाचविला पुजलेला असतो. रोग कमी यावे व अनुकूल वातावरण मिळावे, याकरिता शेतकरी हायटेक टेक्नॉलॉजी वापरतात, मल्चिंग करतात, शेडनेट, पाँलिहाऊस करतात माझे ह्या हाईटेक शेतीला दुमत नाही  पण होते काय ? ८०% शेतकऱ्यांचे कर्जदेखील फिटत नाहीं. मग ओपन मधील शेतकऱ्यांचे हाल विचारायलाच नकोत…. एक वर्ष पिक चांगले येते, मग पुढचे काही वर्ष त्याचे झालेले पैसे पुन्हा त्यातच खर्च करायचे व पुन्हा पहिल्यासारखे उत्पन्न निघण्याची वाट पहायची, हे दुष्ट चक्र चालूच रहाते.  हेच उदाहरण घ्या…., विदर्भात सोयाबिन चे निरुपयोगी, बेभरवशाचे पिक आपण करु लागलो, चार-पाच वर्षांपर्यत केवळ पेरले कि पावसाच्या पाण्यावर काहीही न करता येत होते पण आजची परिस्थिती पहा, सोयाबिनला कोराजन मारायची वेळ आली. कुठे चाललाय शेतकऱ्यांचा खर्च…. कशी परवडणार असी शेती? मला असे वाटते कि, विचार करा समस्या नीट समजून घेणे गरजेचे आहे …. मुख्य उपाय मातीच्या व पिकाच्या पोषणावर करणे गरजेचे आहे, मग दुय्यम उपाय रोगांसाठी करायला हवे. पण होते ते उलटेच. पावसाळी वातावरणात किंवा प्रतिकूल वातावरणात पिकांचे पोषण अत्यल्प होते किंवा थांबते. “पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते .परिणामी प्रतिकारशक्ति कमी होते, पिकं पिवळी पडून विविध रोगांना बळी पडतात. शेतकरी किडी व रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी खूप खर्च करताना दिसतात पण, ह्या समस्येची तिव्रता  न्युट्रीयंट डिफीसिएन्सी  (Nutrient Deficiency)  (अन्नद्रव्यांची कमतरता)  मुळे वाढत आहे,हे त्यांच्या लक्षात येत नाहीं. किडी व रोगावर औषधे मारण्याबरोबर पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवणे त्याहून महत्त्वपूर्ण आहे . अन्यथा शेतकरी किडी व रोगावर औषधे मारत रहातो व पिक कमजोर पडत जाते. हे असे होते कि आपण आपला रोग तर बरा करतोच आहे, पण सलाईनच बंद पडले, मग पूर्णपणे शरीरावर अशक्त पणा जाणवतो एक दिवस पिक कायमचे सोडून द्यावे लागते. अगदी २०-२५ वर्षांपूर्वी तर एवढे रोग नव्हते, कांदा, गव्हू इत्यादी पिके कोणतीही विशेष काळजी न घेता आजच्यापेक्षा छान पिकायचे… असे काय होते जमिनीत , त्या वेळी जे आज नाहीं ?? चिंतन करण्या सारखा गंभीर प्रश्न आहे. जमिनीचा कस म्हणजे ” सेंद्रिय कर्ब “